कळंब (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या कांही दिवसापूर्वी वेगवेगळे प्रकार नागरिकांनी प्रशासनाला उघडकीस आणून दाखवले होते. त्यांच्यावर कार्यवाही होईल म्हणून डॉक्टर व कांही कर्मचारी सुट्टी टाकून रजेवर गेले आहेत. डॉक्टर यांची रजा मंजूर नसताना डॉक्टर गायब झाले असून प्रशासनाच्या कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या कांही दिवसापुन नवीन पुरस्कार सुरू झाला असून येथील डॉक्टर यांना रजा मंजूर नसताना देखील मनमानी कारभार करत सुट्टीवर गेले आहेत. आरोग्य मंत्री यांच्या जिल्ह्यातच असे प्रकार घडत असल्याने रुग्णाची मोठी हेळसांड होत आहे.
कळंब येथील वैद्यकीय अधीक्षक यांची प्रभारी जिल्हा चिकित्सकपदी वर्णी लागली असल्याने त्यांच्याकडे जिल्ह्याचा कारभार देण्यात आला आहे. मात्र कळंब येथील पदभार जिल्हा चिकित्सक यांच्याकडेच असल्याने कळंब उपजिल्हा रुग्णालयातील झालेल्या कारभाराकडे पाहण्यासाठी, फोन उचलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
कळंब उपजिल्हा रुग्णालयात दि.3 ऑगस्टच्या मध्यरात्री डॉक्टर, नर्स, वाचमन व इतर कर्मचारी मेन गेटसह बाजूच्या गेटला कुलूप लावून झोपले होते.संजीत मस्के यांनी या प्रकारांची माहिती प्रशासनास उघड करून दाखवली व लेखी तक्रार दिली. त्याच दिवशी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हे बाहेरील खाजगी मेडिकल मधून औषध देण्याचा प्रकार उघडकीस आला. यावर अधिकारी यांनी विचारणा करत असतानाच रजा टाकून डॉक्टर व कर्मचारी गायब झाले असल्याने मोठ्या चर्चाना उधाण आले आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकारची अधिकारी विचार पूस करतील व कार्यवाही होईल, म्हणून डॉक्टर यांची रजा मंजूर नसताना डॉक्टर गायब झाले आहेत. तर त्याच दिवंशी ऑन ड्युटी असलेल्या नर्स सुद्धा रजा घेऊन सुट्टीवर गेले आहेत.
अधिकारी यांनी रजा मंजूर केली नाही...
सदरील प्रकरणाची चौकशी सुरु असताना हलगर्जीपणा करणाऱ्या व मनमानी कारभार करणाऱ्या डॉक्टर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तसेच सदरील प्रकरणातील डॉटची रजा मंजूर नसताना सुट्टी घेतली कशी हे देखील पाहणे गरजेचे आहे.
पुरावे असताना सुद्धा कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाची दिरंगाई ....
या प्रकरणाचे सर्व पुरावे, तक्रारी प्रशासकीय अधिकारी यांच्या समोर असताना तात्काळ कार्यवाही का होत नाहा असा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक हे कळंबमध्ये हजर नसल्याने कार्यवाहीसाठी विलंब होत आहे.
दररोज 600 त े700 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात. मात्र येथील काही डॉक्टर रजा मंजूर नसतानाही सुट्टीवर गेले असल्याने रुग्णाचे हाल होत आहेत. तर वैद्यकीय अधीक्षक हे फोन उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा छडा कोण लावणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी रजा मागणी केली असून, त्यांना रजा देण्यात आलेली नाही. ते त्यांच्या जिम्मेदारीवर सुट्टी घेऊन गेले आहेत. या सर्व प्रकरणाची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना दिली आहे. या प्रकरणावर कार्यवाही करण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार वैद्यकीय अधीक्षक यांनाच आहेत.
डॉ. केंद्रे
वैद्यकीय अधिकारी कळंब.