कळंब (प्रतिनिधी) - तालुक्यातील महत्वाकांक्षी असलेला पहीलाचा मांजरा नदीवरील लासरा बॅरेजेसचे भुसंपादन गेल्या चार वर्षांपासून निधी उपलब्ध असुनही लाल फितीच्या कासवगतीमुळे रखडले आहे. तत्कालीन पाटबंधारे मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृषी रत्न बी बी ठोंबरे यांनी हा बॅरेजस मंजूर करून घेतला होता. व त्याचे भुमीपुजनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. हा प्रकल्प 2019-20 मध्येच पुर्ण झाला आहे. कोरोना काळात सदरील बॅरेजसचा निधी परत जाऊ नये म्हणून आमदार कैलास घाडगे पाटील यांनी त्याच वेळी कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या खात्यात वर्ग केला. परंतु केवळ प्रशासकीय अनास्था व दप्तर दिरंगाई मुळे या प्रकल्पाचे भुसंपादन रखडले आहे. व पाणीसाठा सुध्दा त्यामुळे रखडला आहे. 

याबाबत आमदार कैलास घाडगे पाटील, डॉ सरोजनी संतोष राऊत, पत्रकार परमेश्वर पालकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला परंतु फाईलची गती काही वाढत नाही. त्यामुळे अधिकारी वर्गाला येवढी अनास्था का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.यामुळे सोमवारी 26 ऑगसट रोजी लासरा, सौंदणा अंबा, आवाड शिरपुरा यासह केज तालुक्यातीलही शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या बाबतचे निवेदन दिनांक 12 ऑगसट रोजी कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना देण्यात आले आहे. 25 ऑगसट पर्यत जर सौदणा येथील थेट खरेदी व उर्वरित गावांचे अवारड करून पाणीसाठा करण्याचा आदेश काढणार नाहीत तोपर्यंत पाण्यात उतरलेले शेतकरी बाहेर येणार नाहीत असा इशारा युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख संदीप पालकर व सर्व शेतकरयानी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, डॉ सरोजनी संतोष राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांना देण्यात आल्या आहेत. 


लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग नोंदविण्याचे आवाहन 

तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम रखडले असून या आंदोलनात धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघातील सर्वच लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवून आपण तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत हे दाखवावे असे आवाहन शेतकरी करत आहेत. 


या बॅरेजसचे उर्वरित पाणी रायगवहण प्रकल्पात होणार लिफ्ट 

खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ठाकरे सरकार असताना सतत कोरडे असणारे रायगवहाण धरण भरावे व शिराढोण जायफळ ताडगाव अशा अनेक गावच्या जमिनी सिंचनाखाली याव्यात म्हणून हा प्रकल्प ही मंजूर केला होता तो ही सध्या रखडलेलाच आहे. 


शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार 

सदरील बॅरेजस 3.01 दलघमी साठवण क्षमता असलेला आहे त्यामुळे केज तालुक्यासह कळंब तालुक्यातील जमिनी अल्प प्रमाणात का होईना बारा महिने बागायती होणार आहेत तसेच सतत दुष्काळाच्या छायेत असणार्या या भागात दुष्काळी परिस्थिती पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाचनार आहेत.

 
Top