कळंब (प्रतिनिधी)- कामगार कल्याण केंद्र मंडळ गट कार्यालय लातूर विभाग छत्रपती संभाजी नगर ,केंद्र कळंब येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी कामगार, इमारत बांधकाम कामगार व कुटुंबीयांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात 148 ज्येष्ठ महिला व पुरुषांची नेत्र तपासणी करण्यात आली हि तपासणी सुपर आय केअर धाराशिव यांच्यावतीने नेत्र तज्ञ डॉ. माया हजारे डॉ. प्रतिभा पारघे, व्यवस्थापक नारायण भिसे यांच्या टीमने केली या शिबिरात डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, सतत डोके दुखणे, तसेच चष्म्याचे नंबर काढणे व मोतीबिंदू, लासरू ,डोळ्यातील वाढलेले मास काढणे आदीची तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शहाजी कानडे, माधवसिंग राजपूत, योग प्रशिक्षक गोपीचंद फावडे गुरुजी कल्याणपुरी यांची उपस्थिती होती उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व नेत्र रोग तज्ञ डॉक्टरांचे स्वागत कामगार कल्याण केंद्र प्रमुख उमेश जगदाळे व महिला सहाय्यक केंद्र संचालिका प्रतिज्ञा वरखेडकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुजा कुलकर्णी, यशोदा शिंपले, वैशाली घाडगे यांनी परिश्रम घेतले.