कळंब (प्रतिनिधी)-अधिकारी जागेवर नाहीत, फोन केला तर उचलत नाहीत, नागरिक कळंब न प मधले हेलपाटे मारुन परेशान झाले तरी येथील कर्मचारी नागरिकांचे काम करत नाहीत. त्यामुळे नागरिकांची थेट उपविभागीय अधिकारी यांच्याकडेच केली मुख्यधिकारी व कर्मचारी यांची तक्रार.
कळंब न प हे सारखे कुठल्या न कुठल्या कामामुळे चर्चेत असते. या न प मध्ये पूर्णवेळ मुख्यधिकारी नसल्याने कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. इतर नागरिकांचे कागदपत्रे थेट त्यांच्या घरी पोहच करण्याचे काम येथील कर्मचारी करतात. गेल्या दोन महिन्यापूर्वी रामेश्वर भवर या नागरिकांनी नावनोंदणी करण्यासाठी सर्व कागदपत्रे व शासकीय रक्कम भरली असून सुद्धा येथील कर्मचारी साहेब नाहीत असे सांगून सामान्य नागरिकांना हेलपाटे मारायला लावत आहेत. याची तक्रार आता उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आली असून यावर कधी कार्यवाही होते हे पाहावे लागणार आहे.
कळंब न प चे मुख्यधिकारी फोनच उचलत नाहीत...
सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे.न प मधील कर्मचारी हे वेळेवर काम करत नसल्याने त्यांची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न असताना मुख्यधिकारी हे फोनच उचलत नाहीत तर तक्रार कोणाकडे करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आम्ही 28 जून रोजी नावनोंदणी करण्यासाठी सर्व कागदपत्रे व शासकीय फीस भरली होती.ते भरल्यानंतर 1 महिन्यात नोंदणी होईल असे संबंधित कर्मचारी यांनी सांगितले होते मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी झाल्यानंतर हि आमची नोंद लावण्यात आली नसून या कार्यालयात आल्यानंतर साहेबच आले नाही असे करणे सांगत असल्याने मी उपविभागीय अधिकरी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करणार आहे.
किशोर भवर,तक्रारदार कळंब.