भूम (प्रतिनिधी)-येथील रवींद्र हायस्कुलच्या 14 व 17 वयोगटाच्या संघांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. भूम येथे शंकरराव पाटील महाविद्यालयातील इनडोअर हॉल मध्ये संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत रवींद्र हायस्कुलच्या दोन्ही संघानी बाजी मारली. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही विजेत्या संघांचा शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती एस व्ही सूळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
17 वर्षे वयोगटात यशोदीप कांबळे,सुजय कुटे,आदित्य जगदाळे, ओम पाटील,मयूर पाटील,मोहित माने,साहिल सुरवसे,सुमित गरड,पृथ्वीराज पवार,विनायक आहेर,देवराज येळमकर,गणेश चौगुले,अमित राऊत तर 14 वर्षे वयोगटाच्या संघात अनुष माने,पार्थ साठे,वैभव पवार,विजय माने,गणेश पवार,अविनाश जगदाळे,सयाजी जगदाळे,कुंदन माने,समर्थ खारगे,वेदांत काशीद,समर्थ बकरे यांचा समावेश होता. यावेळी स्पर्धेचे संयोजक अमर सुपेकर, विजयकुमार पाटील, एस पी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक एम जी सूर्यवंशी हे हजर होते . या स्पर्धेचे उदघाटन संचालक डी डी बोराडे, मुरलीधर काटे,प्राचार्य संतोष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पंच म्हणून प्रा एम जी सूर्यवंशी, निलेश व्हरे, अक्षय बाराते, स्वप्नील सुपेकर, हर्षद बाबर, अमित सुपेकर,कुणाल भारती,जगदीश काळे,स्वराज मुळे यांनी काम पाहिले . विजयी संघाना अमर सुपेकर व कमलाकर डोंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.