धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने भारत सरकार द्वारा नवभारत साक्षरता अभियानांतर्गत भारतीय एकही नागरिक असाक्षर न राहता शिक्षणा पासून वंचित राहू नये या करिता सदर अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा शालेय परिसरात प्रसार व प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, प्रशासकीय अधिकारी तथा माजी मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, सर्वेवर इयत्ता 7वी पर्यवेक्षक राजेंद्र आंबेवाडीकर गुरुवर्य के.टी. फॉ ऊडेशन प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर, अभियान प्रमुख कलाध्यापक शेषनाथ वाघ, सर्वेवर सहशिक्षक श्यामराव राठोड, दिपक केंगार, कलाध्यापक शिवाजी भोसले शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.