भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेवदत्त प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल भूम येथे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक दत्ता भालेराव यांनी केले. तसेच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव पर्यवेक्षक सतीश देशमुख व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मुंडे मॅडम यांनी केले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र  अभिवादन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. 

 
Top