भूम (प्रतिनिधी)- परांडा तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक राहुल अंधारे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाकडून मानव विज्ञान शाखेअंतर्गत इतिहास विषयात पीएच. डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी सोलापूर जिल्हातील सहकार चळवळीचा इतिहास: एक चिकित्सक अभ्यास 1947-2000 या विषयावर संशोधन कार्य केले आहे. सोमेश्वर (ता. बारामती) येथील मुगुटराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी प्रा. डॉ. किसन अंबाडे व बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ. नारायण भोसले ( मुंबई विद्यापीठ) यांनी मार्गदर्शन केले. याबादल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य देविदास वायदंडे ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, प्रा. डॉ. बाबासाहेब दूधभाते, रावसाहेब मिरगणे (शिक्षण निरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे), इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे, हेमंत दळवी (उपसंचालक महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग), प्रा. डॉ. गहिनीनाथ शेळके, प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, शालेय व्यवस्थापन समिती व विविध शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले आहे.