वाशी (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत दि. 27 जुलै रोजी व्यावसायिक क्षेत्रांना भेट या उपक्रमाअंतर्गत येथील  जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेती तंत्र शिक्षण घेणाऱ्या 8 वी, 9 वी, 10 वी मधील विद्यार्थींनी येथील मुक्ताई एजन्सीला भेट देवून तंत्र शिषयक माहिती घेतली.  

यावेळी दुकानाचे मालक तथा प्रशालेचे माजी विद्यार्थी उमेश चेडे यांनी त्यांच्या दुकानातील विविध सबमर्सिबल पंप, पानबूडी पंप, ईलेक्ट्रीक उपकरणे व ईतर शेतीपयोगी औजारांचे प्रात्यक्षिक, कार्य व त्याचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी एजन्सी मालक उमेश चेडे यांचेमार्फत विद्यार्थांना 300 वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी  प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. डी. बामणे, शिक्षिका पुनम चेडे, आर. एन. तारमेकवाड,  डी. बी. किर्तीकर हे उपस्थित होते.


 
Top