कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथील( वनस्पती शास्त्र), श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड, श्रीमती केशरबाई सोनाजीराव  क्षिरसागर  महाविद्यालय बीड व कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “प्रोफेसर विजय कोठेकर जीव विज्ञान व्याख्यानमाला 2024“, दिनांक 05 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, अध्यापक, प्राध्यापक या सर्वांना जीवविज्ञान शास्त्रातील नवीन संशोधनाविषयीची इत्यंभूत माहिती मिळावी या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. 

सदरील व्याख्यानमालेचे उद्घाटन 05 ऑगस्ट रोजी प्राचार्य डॉ. सुनील पवार शि.म.ज्ञा.मोहेकर महाविद्यालय कळंब तसेच  प्रोफेसर निखिल गायकवाड वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने करण्यात आले. व्याख्यानमालेच्या प्रथम सत्राचे वक्ते म्हणून प्रोफेसर गजानन झोरे , जैवतंत्रज्ञान विभाग, केंद्रीय विद्यापीठ राजस्थान यांनी संशोधना मधील नवीन प्रवाह व त्यासाठी परिणामकारक जैविक घटक याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर मुकुंद कुलथे सर , वनस्पतीशास्त्र विभाग , मिलिंद विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, यांनी नवसंशोधकांनी सजीवांसमोरील आव्हाना चा प्रतिकार करण्यासाठी उपलब्ध घटकांचा उपयोग करून नवनवीन संशोधन करावेत असे सुचविले.  दुसरे सत्रमध्ये प्रमुख वक्ते डॉ. सरिता भुतडा मॅडम,  सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कोपरगाव जिल्हा अहमदनगर, यांनी मानवी मन व शरीर स्वास्थ्यासाठी आपल्या आहारामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व महत्त्वपूर्ण आहेत हे सादरीकरणसह स्पष्टीकरण मांडले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. पायल आचरेकर, वनस्पतीशास्त्र विभाग, जय हिंद कॉलेज मुंबई , यांनी स्वस्थ शरीरासाठी प्रमाण युक्त जीवनसत्वे किती आवश्यक आहेत याचे महत्त्व विशद केले. व्याख्यानमालेच्या तिसरे  सत्रमध्ये प्रमुख व्याख्याते प्रोफेसर दत्ता ढाले सर , वनस्पतीशास्त्र विभाग, घोगरी विज्ञान महाविद्यालय धुळे, यांनी महाराष्ट्रातील वनौषधींचा अभ्यास याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये आढळणाऱ्या औषधी वनस्पती त्यांचे संवर्धन आणि त्यांचा मानवी आयुष्यासाठी होणारा उपाय याविषयी या सत्राचे अध्यक्ष डॉ. प्रताप नाईकवाडे सर , आटले, सप्रे, पित्रे महाविद्यालय देवरुख, जिल्हा रत्नागिरी यांनी विशद केले. चौथ्या सत्राचे प्रमुख व्याख्याते डॉ. माला, वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय कोलकत्ता, पश्चिम बंगाल , यांनी वनस्पती संवर्धनातून रोजगार निर्मिती व अर्थकारण याविषयी नवसंशोधकांसह विद्यार्थ्यांसमोर याविषयीचे सादरीकरण केले . या सत्रचे अध्यक्ष प्रोफेसर मिलिंद जाधव सर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, सर सय्यद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर ,यांनी औषधी वनस्पतीचे संवर्धन त्यातून मिळणारा रोजगार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रमध्ये प्रमुख वक्ते डॉ. पूजा सूर्यवंशी, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, भुमरडी महाविद्यालय बिदर, कर्नाटक यांनी औषधी वनस्पतींचे मूलद्रव्यात्मक विश्लेषण आणि त्यातून संशोधनाची तयार होणारी नवीन प्रवाह याविषयी सखोल मार्गदर्शन केले . या सत्रचे अध्यक्ष डॉ. अनिल क्षीरसागर सर, वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी महाविद्यालय कन्नड छत्रपती संभाजीनगर , यांनी वनस्पतीमध्ये आढळून येणारे विविध मूलद्रव्य व त्याची मानवी जीवनासाठीची परिणामकारकता याविषयी सखोल मार्गदर्शन केले.  व्याख्यानमालेच्या सहाव्या सत्रमध्ये प्रमुख निमंत्रित मार्गदर्शक डॉ. संदीप चव्हाण, जैवतंत्रज्ञान विभाग, मायको क्लिनिक अमेरिका  यांनी अनु रेणू आधारित संशोधन पद्धती विज्ञानातील जैविक संरचनेचे वास्तविक स्वरूप उलघडण्यास मदत करते याविषयी आपले मत व्यक्त केले. या सत्रचे अध्यक्ष डॉ. संजय दळवी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, श्री बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा, जिल्हा परभणी, यांनी जीवविज्ञान शास्त्रामधील नवीन संशोधन हे अनुरेणू आधारितच असायला पाहिजे, जेणेकरून त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळते याविषयी आपले मत  व्यक्त केले. प्रोफेसर विजय कोठेकर जीवविज्ञान व्याख्यानमाला 2024 चा समारोप दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाला. समारोपाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर राजेंद्र सातपुते, संचालक , शासकीय विज्ञान संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी विज्ञानातील नवीन प्रवाह संशोधण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावयास हवे, सहभाग नोंदवावा याविषयी नवसंशोधकांना आवाहन केले. सदरील व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉ. माधव फावडे सर, प्राचार्य बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज व प्राचार्य शिवानंद क्षीरसागर सर, श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड व प्राचार्य सुनील पवार सर, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव तसेच प्राचार्य टी एल होळंबे सर, कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड यांनी आयोजकांना सहकार्य करून व्याख्यानमाला यशस्वी पणे पार पाडण्यासाठी परवानगी व मदत दिली. या व्याख्यानमालेमध्ये भारतातील विविध राज्यातील महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापक अशा एकूण 450 सहभागींनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक म्हणून डॉ. संतोष तळेकर ,  श्रीमती अर्चना मुखेडकर ,  डॉ. शीला शिंदे  यांनी मोलाचे सहकार्य केले.या व्याख्यानमालेचे  महाविद्यालयात यशवीरित्या आयोजन संयोजक समितीचे डॉ. श्रीकांत भोसले,डॉ. विश्वजीत म्हस्के यांनी केले , व्याख्यानमालेचे प्रमुख आयोजक प्रोफेसर नवनाथ काशीद, वनस्पतीशास्त्र विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज यांनी व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक बांधव, संयोजक महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले.सचिव डॉ .अशोक मोहेकर सर  यांनी सर्व संयोजकाचे अभिनंदन व कौतुक केले.  विज्ञाना आधारित विविध उपक्रम आयोजन करून ते जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी , प्राध्यापक व संशोधकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.या व्याख्यानमालेसाठी उपप्राचार्य हेमंत भगवान,डॉ. चिंते ,डॉ.जाधव,डॉ. महाजन,डॉ. साठे,डॉ. पावडे,डॉ. सूर्यवंशी,डॉ.राठोड,डॉ. गुंडरे,डॉ.मीनाक्षी जाधव,तसेच  रजिस्टार  हनुमंत जाधव,परिचारिका जया पांचाळ, कल्पना मडके,अरविंद शिंदे,संदीप सूर्यवंशी  यांनी परिश्रम घेतले.

 
Top