भूम (प्रतिनिधी)-माजी मुख्यमंत्री देशाचे मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण निमित्त भूम शहरातील तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उस्मानाबाद जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत आप्पा पाटोळे. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, भूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश मस्कर, तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष भूम तालुका ॲड. सिराज मोगल, राष्ट्रवादी युवा नेते आबासाहेब मस्कर, विनोद मालक नाईकवाडी, गणेश साठे, मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक गौरीशंकर साठे, अशोक नलावडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपकराव मुळे, रामभाऊ नाईकवाडी, बापूसाहेब गिलबिले, बाबर साहेब, औदुंबर जाधव, पँथर सेना मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, प्रभाकरजी डोंबाळे, भीमराव शेंडगे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते