तुळजापूर  (प्रतिनिधी)-बालाजी अमाईन्स लि. आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सी. एस. आर. अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील   तेवीस शाळांना  बेंच काँम्प्युटर अँरो मशीन अदि  शेक्षणिक संस्थांना शालोपयोगी साहित्यांचे वितरण  सोहळा बुधवार दि  14 रोजी बालाजी अमाईन्स लि तामलवाडीयेथे संपन्न होणार. यात जिल्हयातील तेवीस शाळांपैकी बारा शाळांना डेस्के बेंच, 10 काँम्पयुटर, तीन अँरो मशीन वाटप करण्यात येणार आहे.

सदरील सोहळा सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व मुख्य कार्यकारी अधिकारी  मैनक घोष या मान्यवरांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लि. फॅक्टरी, तामलवाडी ता. तुळजापूर, जिल्हा धाराशिव या ठिकाणी होणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थितीत राहण्याचे आवाहन बालाजी अमाईन्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, एन. राजेश्वर रेड्डी, सी एस आर विभाग प्रमुख बिराजदार यांनी केले आहे.

 
Top