धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे नेते शरदचंद्र पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्या व महाष्टातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा लढा महाराष्टाच्या स्वाभिमानाचा या टॅगलाईनखाली 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून येथून सुरु झाली आहे. ही यात्रा धाराशिव जिल्ह्यात 13 व 14 ऑगस्ट रोजी येत असल्याने या यात्रेच्या तयारीसाठी धाराशिव येथे सोमवारी (दि.12) राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात दुपारी 12 वाजता याबाबत आढावा व कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी तातडीची बेठक घेण्यात येणार आहे.
या बेठकीत जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या बेठकीत यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी करायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.