उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील बोरी येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता करणे 11 लक्ष रुपये तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत सावळसुर येथील महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे. या दोन्ही कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

उमरगा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागील अडीच वर्षांत कोटयावधीचा निधी मंजूर करुन आणला आहे. आमदार चौगुले यांनी विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध विकास कामाचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पणाचा सपाटा लावला आहे. तालुक्यातील बोरी येथील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता करणे 11 लक्ष रुपये कामाचे तसेच सावळसुर येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणेसाठी 10 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे. या दोन्ही कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोरीचे माजी सरपंच बालक मदने यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सावळसुर ते बोरी रस्ता सुधारणा करणे 8 कोटी 87 लक्ष, राममा 548 बी ते मातोळा बोरी ग्रा.मा.20 या रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी, 2515 योजनेतून गावांतर्गत रस्ता करणे 10 लक्ष, 95/5 योजनेतून रस्ता करणे 20 लक्ष, जि.प.प्रा.शाळा दुरुस्ती करणे 5 लक्ष, आमदार स्थानिक विकास निधीतून सार्वजनिक स्मशानभूमी विकसित करणे 10 लक्ष, व दलित स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता करणे 20 लक्ष रुपये असे एकुण 10 कोटी 63 लक्ष रुपये निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आमदार चौगुले यांचा  सत्कार केला. यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, उपतालुका प्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, बालाजी पवार, सरपंच प्रेमनाथ कांबळे, उपसरपंच बाळू माशाळ, नितीन पाटील, हरी भोसले, नितीन पाटील, हरी भोसले, चंदू मुळे, आकाश संजय पवार, आकाश पवार, घनशाम चिंचोळे, इंद्रजीत पाटील, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेअरमन विनायक बिराजदार, सहदेव बिराजदार, बाबुराव सूर्यवंशी, भालचंद्र बिराजदार, महादेव बिराजदार, दिनकर बाबळसुरे, चंद्रकांत मुळे, आकाश पाटील, संजय पवार, आकाश पवार आदीसह दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top