तुळजापूर (प्रतिनिधी)- काक्रंबा परिसरातील स्टोन क्रेशर वरील दरोडा प्रकरणी सर्व आरोपीतांना गुन्हयात अटक केली असून, गुन्हयातील सर्व माल हस्तगत केला असुन गुन्हयातील आरोपीतांनी वापलेला छोटा हत्ती एकूण किंमत अंदाजे 8 लाख 72 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपीतांच्या पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील काही आरोपीतांचा इतिहास गुन्हेगारींचा असल्याने यांच्या विरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी पञकार परिषदेत केले.
यावेळी या गुन्हे प्रकरणी माहिती देताना देशमुख पुढे म्हणाले की, काक्रंबा परिसरातील झालेल्या दरोडा प्रकरणी ग्रामस्थांनी दोन आरोपी पकडले असुन उर्वरीत चार आरोपी पोलिसांनी तात्काळ पकडले आहेत. सदर गुन्हयातील मुद्देमाल पुर्णता हस्तगत केला आहे. गुन्हेतील वाहन ही जप्त करण्यात आले आहे. सदरील आरोपींपैकी काहि आरोपीं विरोधात तुळजापूर, तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. तरी यांच्या विरोधात नागरिकांची काही तक्रार असल्यास नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे यावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख यांनी केले आहे. यातील सहा आरोपीना अटक केले आहेे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सो. अपर पोलीस अधिक्षक सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. तुळजापुर तसेच पोलीस निरीक्षक रविंद खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भालेराव, पोउपनि धनुरे, पोहेकॉ करवर, पोना गणेश माळी, मपोअं शितल लोकरे, शिंदे, आचार्य यांच्या पथकांनी केली आहे.