तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख 74 हजार 044 हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी 7 लाख हजार 13 शेतकऱ्यांनी 214शेतक-यांनी 1 रुपयेप्रमाणे पिक विमा योजनेसाठी अर्ज केला आहे.
निसर्गाचा लहरीपणा वारंवार अनुभवास येत असल्यामुळे आपल्या शेतातील पिकांचा पीकविमा उतरवून या प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी शेतकरी सरसावल्याचे दिसत आहे. पीकविमा योजनेत मागील वर्षीपासून फक्त एक रुपयात सहभागी होता येत आहे. पीकविमा योजनेबद्दल गैरसमज असल्याने यापूर्वी शेतकऱ्यांचा या योजनेस अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, मागील कांही वर्षात पीकविम्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठा प्रमाणात पिकविमा अर्ज भरले आहेत.
सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा यासाठी या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ प्रधानमंत्री पीकविमा योजना सहभागी होण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत पिकांचा एक रुपयात पीक विमा हप्ता भरावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अवधुत मुळे यांनी केले आहे. यंदा वेळेत पाऊस झाल्याने सर्वत्र चांगली पिके बहरली आहेत. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशातच अनेक शेतकरी पंतप्रधान पीक विमा
योजनेचा अर्ज करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, संकेतस्थळ आणि सर्व्हर मंद गतीने सुरु असल्याने, अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी
विलंब झाला आहे. यामुळे पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत वाढ देण्यात आली होती.
तालुका निहाय पीकविमा भरलेले शेतकरी व क्षेत्र (कंसात) तालुका क्षेत्र हे. मध्ये शेतकरी संख्या वीमा संरक्षीत रक्कम
भूम- 1,05,524 (61,780) 3,00,46,83,615, धाराशिव 1,10,728(1,10,220) 5,88,33,08,425, कळंब- 1,01,212(78,660) 4,19,82,04,173, लोहारा- 44,437(43,031)2,23,53,67,633, परांडा- (49531)2,07,49,11,374, तुळजापूर -1,00,620 (1,13,951) 6,02'67,28,910, उमरगा -80,103(73,792)3,78,31,51,828,वाशी- 70,715,(43,079)2,25,25,69,385, ऐकुण शेतकरी 7,13,214 विमा संरक्षित क्षेञ 5,74,044 एकुण रक्कम 29,45,89,25,341.