धाराशिव  (प्रतिनिधी) - 2017 व 2019 पूर्वी साप्ताहिक वृत्तपत्रावर अन्याय करणारा जाहिरात बंदीचा आदेश त्वरित मागे घेण्यात यावा. तर 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना विशेष जाहिरात देण्यात यावी. वृत्तपत्रांना जाहिरात देण्यासंदर्भात दि.15 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.20 ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्यावतीने वेगवेगळ्या विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रसिद्धीसाठी राज्यातील मोठ्या आणि निवडक दैनिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करणे. तसेच आकाशवाणी, सोशल मीडिया, डिजिटल माध्यम व व्हाईस माध्यम यांच्यामार्फत प्रसार करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. संपूर्ण राज्यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्र हे आजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शासनाच्या सर्व योजनांची माहिती साप्ताहिक वृत्तपत्रातून जास्तीत जास्त जागेमध्ये जनतेपर्यंत पोहोचवीत आहेत. परंतू या जाहिरात शेडूलमधून साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळण्यात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरातीच्या शेडूलमधून उघडण्यात आले होते. त्यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या वतीने या विरोधात आवाज उठविल्या होता. परंतू त्यावेळी सर्व जाहिरातीचे वितरण झाले आहे. पुढच्या वेळी नक्की प्राधान्य देऊ असे सांगण्यात आले होते. असे असता असूनही पुन्हा साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरातीच्या शेडूलमधून वगळण्यात आले असून हे साप्ताहिक वृत्तपत्रावर अन्याय करणारे आहे. शासनमान्य वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंधनकारक असताना 2017 व 2019 चा जाहिरात धोरणाचा आदेश अन्याय करणार आहे. त्यामुळे हा आदेश त्वरित रद्द करून पुन्हा दैनिकांच्या बरोबरीने साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावर व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, सा. विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष जफर शेख, किरण कांबळे आदींच्या सह्या आहेत.

 
Top