कळंब (प्रतिनिधी)- उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील डॉक्टर्स रुग्णांना उत्कृष्ट सेवा देत असून त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल आज दिनांक 1 जुलै डॉक्टर्स डे निमित्ताने कळंब येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी ,डॉ. शरद दशरथ, डॉ. राऊत, डॉ. भक्ती गीते डॉ. मीरा दशरथ यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ. धर्माधिकारी यांनी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध  असून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दवाखान्यात करण्यात येत असून हा विभाग आता सक्रिय करण्यात आला आहे असे सांगून रुग्णांनी खाजगी दवाखान्यात उपचार न घेता उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर्स रुग्णांना देत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ, प्रकाश भडंगे,माधवसिंग राजपूत, सचिन डोरले ,कल्याण कुंभार, बंडू ताटे, बाबा कुंभार ,नागेश मोरे, संतोष लोंढे या कार्यक्रमात सहभाग घेतला.


 
Top