भूम (प्रतिनिधी)- समाजाचा मुख्य कणा असलेल्या बळीराजा व साक्षात देवदूताचे काम करणाऱ्या डॉक्टरांप्रति आपल्या संवेदना प्रकट व्हाव्यात यासाठी प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये कृषी दिन व डॉक्टर दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर व शेतकरी राजाची वेशभूषा केली होती. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त 1 जुलै हा कृषी म्हणून साजरा केला जातो. तर भारतरत्न डॉ. ब्रीनदण दास यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी व डॉक्टर हे समाजाचा मुख्य कणा असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी शिक्षिका मेघा सुपेकर, दीपिका टकले, सेजल सुरवसे, भाग्यश्री डांगे यांनी नियोजन केले तर आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम केले.

 
Top