तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील नळदुर्ग रोड परिसरात नगर विकास पुर्नरचना योजने अंतर्गत जिथे मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी विकास कामे केले जात आहेत. जिथे मानवी वस्ती आहे तिथे विकास कामे केले जात नसल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सदरचे रस्ते रद्द करून मानवी वसाहतीच्या ठिकाणी हा निधी वर्ग करून जय हनुमान नगर, अजिंक्य रेसिडेंट मस्के प्लॉटिंग या भागातील विकास कामे पूर्ण करावेत अशा मागणीचे निवेदन या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी यांना दिले.

हनुमान नगर अंतर्गत अजिंक्य रेसिडेंट कॉलनी मस्के प्लॉटिंग परिसरात सद्यस्थितीत दोनशे ते अडीचशे घरांची वसाहत असून त्यामध्ये एक ते दीड हजार लोकांचा समुदाय वास्तव्यास आहे. सदर परिस्थितील रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कायमस्वरूपात असून सध्या रोड फार खराब झालेले आहेत. पावसाचे पाणी सर्व रोडवर साचलेले आहे. त्यामुळे लोकांना जाणे येण्यास सतत त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या पाईपलाईन मधून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. आपल्या शहरात नगर विकास पुनर्रचना योजनेअंतर्गत कामे होत असून त्यामध्ये आमच्या भागातील विकास काम घेण्यात आल्याचे दिसत नाही. परंतु डोंगर दरीतील रस्ता असून येथे मानवी वसाहत नाही. तरी सदरचे रस्ते रद्द करून मानवी वसाहतीच्या ठिकाणी हा निधी वर्ग करून जय हनुमान नगर, अजिंक्य रेसिडेंट मस्के प्लॉटिंग या भागातील विकास कामे पूर्ण करावेत. सदरील निवेदनावर हनुमान नगर येथील रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top