धाराशिव (प्रतिनिधी)- धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषण आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष रवि माळाळे यांनी गुरुवारी (दि.18) उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
सकल धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शामसुंदर श्रीकांत तेरकर, कमलाकर राजेंद्र दाणे, राजू गौतम मैंदाड, समाधान युवराज पडळकर यांनी 15 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरु आहे. गुरुवारी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष रवि माळाळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत आपण पाठीशी असल्याचे जिल्हाध्यक्ष माळाळे यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के, आळणी ग्रापं सदस्य आकाश कदम तसेच कुमार गायकवाड, बंटी रोकडे, संकल्प माळाळे, श्रीकांत गायकवाड व रिपाइंचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.