धाराशिव (प्रतिनिधी)- पुष्पक मंगल कार्यालय येथे रोटरी क्लब उस्मानाबादचा पदग्रहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुणे प्रवीण बर्दापूरकर जेष्ठ संपादक, लेखक व ब्लॉगर आणि असिस्टंट गव्हर्नर अजित गोबारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

2023-24 च्या मावळत्या सचिवा डॉ. मीना जिंतूरकर यांनी गतवर्षीचा अहवाल रंजकपद्धतीत पदद्यात वाचून दाखविला. मावळत्या अध्यक्षा डॉ. अनार साळूंके यांनी त्यांचे मनोगत मांडले. दोघींनीही त्यांचा पदभार नूतन अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर व नूतन सचिव आनंद कुलकर्णी यांचेकडे सुपूर्त केला. प्रवीण बर्दापूरकर व अजित गोबरे यांच्याहस्ते नूतन कार्यकारणी, रोटरी सेवा ट्रस्टचे ट्रस्टी यांचा सत्कार करण्यात आला. सुनील गर्जे यांनी यावर्षीचा रोटरी सेवा ट्रस्टचा अहवाल सादर केला. गोबारे यांनी डिस्ट्र गव्हर्नर डॉ. साबू यांचा संदेश वाचून दाखविला व मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर यांनी यावर्षीचे कामाचा आराखडा सांगितला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. मीना जिंतूरकर यांनी करुन दिला. प्रमुख पाहुणे प्रवीण बर्दापूरकर यांनी राजकारणापलीकडील राजकारणी या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी राजकारणी लोकाकडे पाहण्याचा सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे यावर भाष्य केले. त्यानी विविध राजकारणी लोकांच्या कै. गोपीनाथ मुंडे, कै. विलासराव देशमुख, कै. वसंतदादा पाटील, नितीन गडकरी अशा अनेक दिग्जांच्या आठवणीना उजळा दिला. सचिव आनंद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय देशमाने आणि डॉ. पल्लवी कोथळकर यांनी केले.

 
Top