तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील आपसिंगा परिसरातील कामठा - वरवंटी रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात या मथळा खाली दैनिकात दि. 22 जुलै रोजी वृत्त प्रसिध्द याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभित्यांने घेवुन रस्ता वर वाहनास येणारे काटेरी झाडेझुडपे काढल्याने वाहन चालकांमधुन आनंद व्यक्त केला जात आहे.
या काटेरी झुडपामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. वारंवार सांगूनही अधिकारी हे रस्त्यावरील काटेरी झाडे काढत नाहीत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे या रस्त्यावर सतत किरकोळ अपघात होत होते. सदरील आपल्या वृत्त प्रसिध्द होताच या मार्गावरील काटेरी झाढेझुडपे काढल्याने सदरील रस्ता मोकळा झाला आहे.