धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा शहरातील अवैध कत्तल खान्यावर छापा मारून 2 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गोवंशीय जातीचे मांस व कातडी असा एकूण 3 लाख 38 हजार रूपयांचा माल जप्त करण्यता आला आहे.

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की,  परंडा शहरातील कुरेशी गल्ली दर्गा रोड येथे लतिफा कुरेशी हे त्यांच्या राहते घराच्या पाठीमागे गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची  माहिती  मिळाल्याने परंडा पोलीस ठाण्याचे पथक  सदर ठिकाणी रवाना होउन अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला. सदर छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणी काही इसम मिळून आले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शाहरुख राजु शेख वय 22 वर्षे, अरबाज राजू शेख, वय 21 वर्षे, दोघे रा. शेकापुर ता. भूम ह.मु. कुरेशी गल्ली, परंडा, ता. परंडा, जि. धाराशिव असे मिळून आले. सदर छापा कारवाई दरम्यान पोलीस पथकाने नमुद कत्तलखान्यामध्ये  मिळून आलेले अंदाजे 1 हजार 690 किलो वजनाचे गोवंशीय जातीचे जर्शी गायीचे वासरांचे मांस व कातडी असे एकुण 3 लाख 38 हजार रूपये किंमतीचा माल आरोपीच्या ताब्यात मिळून आला. ते जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जातीचे जर्शी गायीचे वासरांचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन गुंडाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहा पोलीस निरीक्षक मुसळे, सहा पोलीस निरीक्षक सुर्वे, पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार गुंडाळे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top