धाराशिव (प्रतिनिधी)- घरफोडीतील आरोपीचे फिंगरप्रिंट विषयी अहवाल येताच सदर आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे.

पोलीस ठाणे नळदुर्ग येथील गुन्ह्यामधील आरोपी नामे नितीन बाबु उर्फ बापू भोसले रा. बिस्मीला नगर बरड गल्ली, मुळेगाव रोड सोलापूर याचे फिंगरप्रींट आले आहे अशी माहिती सपोनि एस.ए. कराळे यांनी फोनवरुन कळविल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावून नमुद आरोपीचा शोध घेतला. नितीन बाबु उर्फ बापू भोसले वय 30 वर्षे, रा. बिस्मीला नगर बरड गल्ली, मुळेगाव रोड सोलापूर यास पकडले. आरोपीने पोलिसांना मी व पिंटु जग्या भोसले रा. कारेफळे यांनी मिळून मागील तीन चार महिन्यापासून काळेगाव, जळकोट, अणदुर या गावात मोटरसायकलवरून जावून बंद घरे फोडून चोऱ्या केल्या असे सागिंतले. आरोपीच्या विरोधात विविध पोलिस स्टेशनमधून माहिती घेतली. आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने एकुण 75 हजार रूपये किंमतीचे जप्त करण्यात आले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्र वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके, पोह हुसेन सय्यद,  प्रदिप वाघमारे, मपोह शैला टेळे, पोना नितीन जाधवर, रवींद्र आरसेवाड, चालक संतोष लाटे, प्रशांत किवंडे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top