ढोकी (प्रतिनिधी)- ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा माता - पालक मेळावा घेण्यात आला. या पालक मेळाव्यास अध्यक्ष म्हणून तुगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी सचिन लोमटे व प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वाकुरे उपस्थित होते.

या पालक मेळाव्यामध्ये पालक विद्यार्थी व शिक्षक यांच्या एकत्रित पणामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या - अडचणी जाणून घेण्यात आल्या. दरवर्षी या कोचिंग क्लासेस चा निकाल शंभर टक्के लागतो तसेच गणित विज्ञान व इंग्रजी या विषयात ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थी ढोकी व पंचक्रोशीतून सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होतात. दर आठवड्याला प्रत्येक विषयाची घटक चाचणी घेतली जाते यामुळे आज तागायत या क्लासेस मधील बरेच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन चांगल्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पुढे येत आहेत. यामुळे आजच्या पालक मेळाव्याला पालकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाकुरे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग, टीव्हीचा उपयोग, जेवण करत असताना व अभ्यास करत असताना करू नये त्यामध्ये वेळ घालवू  नये असे सांगितले.  त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन लोमटे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच पालक शिक्षक व विध्यार्थी यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.  दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मधील मागील वर्षाची विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांनी ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे कौतुक केले.

त्याचबरोबर पालक प्रतिनिधी सुनील दत्त थोरात व धनंजय वाकुरे यांच्या सौभाग्यवती वाकुरे मॅडम यांनी शहरी शाळा व ग्रामीण भागातील शाळा यामध्ये फरक व्यक्त केला शहरी भागामध्ये आपले विद्यार्थी  मागे का पडतात ? याविषयी खंत व्यक्त केली.हजर असलेल्या पालकांनी आपल्या पाल्या विषयी मत व्यक्त केले.यामुळे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात आल्यामुळे ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे “कार्य हीच पूजा “ समजून विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक अंकुश सुभाष जाधव वमहादेव गाढवे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रेया धनंजय वाकुरे हिने केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाळ माळी यांनी केले.या पालक मेळाव्यास ढोकी व परिसरातील  माता - पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top