तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत 5 वी मध्ये 5 विद्यार्थी व 8 वी मध्ये 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक  झाले आहेत.

इयता 5 वी मध्ये इंद्रधन शरद गोडगे, आर्यन अविनाश पाडुळे, सार्थक नागेश खोटे,सई संजय जाधव, विराज आबा पौळ हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. त्याना एस. यु. गोडगे. एस. बी. पाटील, एस. एस. बळवंतराव, ए. बी. नितळीकर यानी मार्गदर्शन केले. तर इयत्ता 8 वी मध्ये श्रद्धा तानाजी वराळे, प्राची बबन कोकरे, अमृता मोहन भोंडवे, वेदांत बाळासाहेब फंड हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. त्यांना बी.डी. कांबळे, एस. यु. गोडगे, आर. एम.देवकते, एस .टी. कोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक जे. के. बेदरे, पर्यवेक्षक एस. एस.पाटील, शिक्षक पालक संघ व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ए. एस. बागवान यांनी अभिनंदन केले.

 
Top