तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन विद्यार्थी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.                             

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू प्रशालेतील विद्यार्थी काझी मारूफ मुखील व  बीबीफातेमा इरफान मुलानी या दोन विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीतून शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. या  यशाबद्दल मुख्याध्यापिका अर्शिया शेख, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.

 
Top