धाराशिव (प्रतिनिधी)-शासकीय विश्रामगृह धाराशिव या ठिकाणी भाजपा प्रदेश चिटणीस सर्वश्री सचिन लोंढे,युवा उद्योजक नरसिंह मेटकरी,भाजपा युवा नेते व्यंकटेश कोळी,हात मदतीचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह मगर,भाजपा युवा नेते ओंकार देवकते,एरंडवाडी चे सरपंच दत्ता गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोंढे प्रतिष्ठान धाराशिव यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 या जयंती समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

जयंती समितीच्या अध्यक्षपदी ऋषी मगर, उपाध्यक्षपदी रोहित वाघमारे, सचिवपदी विनोद गायकवाड, कार्याध्यक्षपदी अजित पेठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना फळे वाटप करणे,गरजु शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच निसर्गाशी नाते घट्ट ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे लोंढे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  सुरज लोंढे यांनी या बैठकीमध्ये सांगितले.

या बैठकीसाठी केदारनाथ गव्हाळे, प्रदीप मगर, सुरज मगर, साहिल मगर, अक्षय गंगावणे, रोहित वाघमारे, अक्षय इंगळे, रितेश गायकवाड, प्रवीण सोनवणे, प्रशांत मगर, रोहन लोंढे, रोहित गायकवाड, गणेश सोनटक्के, शेखर चांदणे, दादा मगर, गणेश सोनटक्के, रितेश खंडागळे, प्रतीक सोनटक्के, दत्ता कोतवाल, सागर अरण, यश माळी, सागर माळी, आशिष साळुंखे, इत्यादी शहर व परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top