परंडा (प्रतिनिधी) - शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्रा,डॉ. तानाजीराव सावंत यांचे आदेशानुसार दिनांक 1 जूलै रोजी शिवसेना सदस्य नोंदणी पंधरवडा करण्यासाठी सूचित केले आहे. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 2 जूलै रोजी परंडा येथील सावंत यांच्या संपर्क कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात करण्यात आली.

शिवसेना सदस्य नोंदणी सुरुवात धाराशिव जिल्ह्याचे मा.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सांळुखे, जिल्हा समन्वयक गौतम लटके सर, तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, तालुका संघटक जयदेव गोफणे, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, शहर प्रमुख परंडा बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. या सदस्य नोंदणीस शहर व तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी आपली सदस्य नोंदणी करून घेतली. यावेळी परंडा शहर वं तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, सोषल मिडीया व शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top