ढोकी (प्रतिनिधी)- ढोकी शहरात गेल्या अनेक महिन्या पासून विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणत मोठी वाढ झाल्याने मोठया गैरसोयी चा सामना करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दि 3 रोजी सकाळी 11 च्या सुमारास महावितरण च्या कार्यालया समोर महावितरण च्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत धरणे आंदोलन केले.

गेल्या अनेक महिन्या पासून गावातील अचानक विद्युत पुरवठा खंडित होत आहे एकदा विज गेली की चार -चार तास येत नाही आणि आल.  तर 10 ते 15 मिनिट सुद्धा टिकत नाही तर कधी कधी रात्रभर गायब असते त्या मुळे नागरिकांना रात्रभर जागरण करत गैरसोईचा सामना करावा लागत आहे. महावितरण कार्यालयात फोन लावला तर कर्मचारी फोन उचलत नाहीत आणि उचलला तर समाधान कारक उत्तर नं देता उडावा उडवी ची उत्तरे देत कारणे सांगत कधी मुरुड सबस्टेशन हुन गेली. तर कधी परळी वरून गेली आश्या प्रकारच्या थापा मारतात. तसेच मागील काही महिन्या पूर्वी 5 कोटी रुपये खर्चून सौर ऊर्जा प्रकल्प उभा केलाय मात्र तो आध्यप कार्यान्वित केला नाही हा प्रकल्प काय फक्त गुत्तेदारचे पोट भरायला केला आहे का? की नुसती शोभेची वस्तू म्हणून उभा केलाय असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे. विजेवर आधारित असलेल्या छोटया मोठया व्यावसायिक जस की टेलरिंग कामगार, टीव्ही दुरुस्ती, इलेक्ट्रिक दुकानें, मिरची कांडप, पिठाच्या गिरण्या, मोबाईल रिपेरिंग ची दुकानें, वेल्डिंग वर्क्स, या सारखे लहान सहान व्यावसायिक उद्योजक अक्षरशः व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेत काही व्यावसायिक यांनी तर या विजेच्या लंपन वाला वैतागून चक्क ढोकी गाव सोडून आपला व्यवसाय इतरत्र स्तलांतरित करावा लागला आहे. ऐन सणासुदीच्या काळात तर हमखास वीज पुरवठा गायब होत असतो शाळा कॉलेज तसेच इतर स्पर्धा परीक्षा ची तयारी करणारे विध्यार्थी यांचे देखील मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

गावातील अनेक ठिकाण च्या लोक वस्तीत विद्युत खांब वाकलेले आहेत तर बऱ्याच ठिकाणी गावात-शेतात तारा लोंबकाळात आहेत. या बाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी याची माहिती कार्यालयास देऊन देखील महावितरणचे कर्मचारी व अधिकारी याकडे चक्क दुर्लक्ष करीत आहेत. तसेच व्यापाऱ्याच्या दुकाना समोरून तर बऱ्याच ठिकाणी घरा वरून, इमारतीच्या जवळून तारा गेल्यात त्याला विद्युत गार्ड बसवा म्हणून कित्येक वेळा तोंडी तथा लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र त्यावर देखील कुठलीच कारवाई झाली नाही. एकाधी मोठी वित्त अथवा जीवित हानी झाल्यावर याची दुरुस्ती करणार का असा सवाल विचारला जात आहे. तसेच ढोकी सारख्या 20 ते 25 हजार लोक वस्ती असलेल्या गावाला चांगला कार्यतत्पर अधिकारी नेमावा जे आहेत ते सर्व निष्क्रिय आहेत. त्याची तात्काळ बदली करून सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. महावितरण कार्यालयच्या परिसरात कर्मचारी अधिकारी राहण्यासाठी मोठी इमारत असून देखील कुठलाच कर्मचारी ना अधिकारी या निवासस्थानात ना राहता इतरत्र शहरच्या ठिकाणी जाऊन राहतात व आपल्या सोयीस्कर वेळे नुसार येतात. त्यामुळे सदर इमारत धूळ खात पडून आहे. तरी कार्यालयच्या ठिकाणी राहून नोकरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करावी. तसेच जनतेची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी जो पर्येंत सक्षम अधिकारी येऊन आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करत नाही तो पर्येंत आम्ही कार्यालयातून उठणार नाहीत असा आक्रमक पवित्र ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते. त्या नंतर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आल्या वर त्यांनी लवकरच विद्युत पुरवठ्या बाबत च्या समस्या सोडविण्यात येतील व पुरवठा सुरुळीत पणे गावाला देऊ असे आश्वासन दिल्यावरच ग्रामस्थांनी आपल उपोषण मागे घेतले. या वेळी संग्राम देशमुख,महादेव गाढवे, अबरार काझी, मुसा शेख,फजल शेख, उमेश शिंदे, धनु शिंदे, संतोष कंदळे, एस के इनामदार, दत्ता साळुंखे, राजु पठाण, शाम गुरव, यांच्या सह ढोकी, वाखरवाडी येथील शेतकरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top