धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांचा फेर तपासणीचा निकाल वेळेत लावणे बाबत संचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उप परिसर धाराशिव यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावरती सकारात्मकपणे पाऊल उचलुत आणि लवकरात लवकर निकाल लावुत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इथून पुढे अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाहीत असे त्यांनी यावेळी आश्वासन ही दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुजय, बब्रुवान वाकुरे व विद्यापीठामध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.