धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील पवनचक्कीचे कॉपरचे वायर चोरणारी चारजणाची टोळी धाराशिव स्थानिक गुन्हा शाखेने पकडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंजनसोंडा शिवारातील शेत गट नं 108 मधील उत्तम एंटरप्रायझेस कंपनीचे आर ई 04 पॉइंटवरील टॉवरमधील कॉपरचे तारा अंदाजे 50 हजार रूपये किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी महेश महादेव माळी, वय 23 वर्षे, रा. अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव यांनी नोंदवला होता.  गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व तांत्रिक विश्लेषनावरुन पारा पारधीपिढी, ता. वाशी येथील तानाजी उर्फ चिक्या आसाराम काळे, वय 26 वर्षे, अंजनसोंडा ता. वाशी, जिवन उर्फ दत्तात्रय अच्युत क्षिरसागर, वय 31 वर्षे, भोगजी ता. कळंब जि. धाराशिव, आकाश विष्णु खराटे, सारोळा मांडवा ता. वाशी जि. धाराशिव, उत्तरेश्वर महादेव दराडे, वय 30 वर्षे यासह गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही दिवसात नमुद ठिकाणाहून ताब्यात घेउन त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली. नमुद आरोपींनी आम्ही व आमचे अन्य साथीदारांनी केबल वायर चोरी केल्याची कबुली  दिली. यावरुन पथकाने नमुद आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप व मोबाईल फोन जप्त करुन पुढील कार्यवाहिस्तव नमूद आरोपींना वाशी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, यांच्या पथकाने केली आहे.

 
Top