धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील वर्ग 1 च्या जमिनी वर्ग 2 मध्ये रूपांतरीत केल्यामुळे अनेकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके व शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. 

काल झालेल्या भेटी नंतर केवळ एकच दिवसात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तत्काळ बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून शिवसेना प्रवक्ते योगेश केदार आणि सूरज साळुंके उपस्थित होते. 

यावेळी जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने शेतकरी म्हणून शिवसेना प्रवक्ते योगेश केदार, सुरज साळुंके आणि यांनी बाजू मांडली. सर्व बारकावे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. आता आजच्या बैठकीत पारित झालेला प्रस्ताव पुढच्या मंगळवारी किंवा बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट मध्ये ठेवला जाईल. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमती नंतर त्याचा शासन आदेश निघेल.

 
Top