तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेञ तुळजापूर विकास आराखडा राबवाताना स्थानिकांचे घराचे संपादन न करता मंदीर परिसरात मागे असणाऱ्या जागेचा पुरपुर वापर करुन विकास आराखडा राबवावा. अशी मागणी करीत तुळजापूर विकास प्राधिकरणात झालेल्या खर्चाचे स्पेशल आँडीट करावे. अर्धवट विकास कामांची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे शाम पवार यांनी केली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला 13/10/2023 रोजी दिलेल्या हरकत पञात म्हटलं आहे कि, तिर्थक्षेञ तुळजापूर येथे होणाऱ्या विकास आराखडा अधिकारी आणि लोकप्रतीनिधी यांनी संगणमताने तयार केलेला आहे. यात  मंदिराची आणि राज्य सरकारच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. प्रशासणाने पुर्वी दर्शन मंडप केलेला आहे. त्यावेळी केलेल्या दर्शन मंडपास, नगररचना खात्याची मंजुरी नाही. तुळजाभवानी मंदिराची  प्रशासकिय इमारतीची उभारणी करताना आराखडा वेगळा ठेवला आणि बांधकाम प्रत्यक्षात वेगळेच केलेले आहे. आताचा दर्शन मंडप हा पैसे उधळपट्टीसाठी आहे. 

जिल्हाधिकारी तथा  मंदिर समितीचे अध्यक्ष हे आराखडा जाहिर करीत नाहीत. परंतु लोकप्रतीनिधी व मंदिराचे विश्वस्त हे मात्र त्यांनीच आराखडा तयार केला आहे असे सांगत आहेत. तुळजापूर विकास प्राधिकरणासाठी खर्च केलेल्या  रकमेचे  स्पेशल ऑडीट करावे व ते जनतेसमोर ठेवावे व ऑडीटमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 

विकास आराखडा करताना सर्व संमतीने करावा. वरील हरकती बाबत संदर्भीय हरकत अर्जानुसार हरकत घेवुन आठ महिण्याचा कालावधी पुर्ण झाला आहे. परंतु  हरकतीवर आज पर्यत कोणतीही कार्यवाही अथवा सुनावनी झालेली नाही.  वरील बाबींचा विचार करुन आपल्या मार्फतने योग्यतो न्याय द्यावा अन्यथा   लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल व वेळ प्रसंगी मे. न्यायालयात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास आपण स्वत: जबाबदार राहाल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शाम पवार यांनी दिला.

 
Top