धाराशिव (प्रतिनिधी)- वय वर्ष 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना चष्मा,श्रवण यंत्र, ट्रायपॉड,स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस,लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इत्यादी साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी एक वेळ एकरकमी 3 हजार रुपयांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.

 तसेच मन:स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांची मानसिकता अबाधीत ठेवण्यासाठीही सुद्धा ही योजना असून या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नात 2 लक्ष रुपयांच्या आत आहे व ज्यांचे वय 65 वर्षे पूर्ण झाले आहे,अशा पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण आहे व लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

 
Top