भूम (प्रतिनिधी)- इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश. शहरी भागातून सर्वाधिक विद्यार्थी धारक असणारी शाळा.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे -कुमारी होळकर हिरण्मई सचिन 214 गुण, कुमारी कोल्हे अनुश्री औदुंबर 212 गुण, कुमारी मोटे सिद्धी शाहू 210 गुण. इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे - कुमार बोराडे पार्थ संजय 228 गुण.(जिल्ह्यात 18 वा.), कुमार कांबळे उत्कर्ष बाळासाहेब 214 गुण.(जिल्ह्यात 33 वा.), कुमार शिंदे हिमांशू अजित 198 गुण, कुमारी जाधवर श्रावणी सतीश 194 गुण.

वरील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच प्रशालेची माजी विद्यार्थिनी कुमारी काळे प्रतीक्षा मेघराज हिने नीट परीक्षेत 645 गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भूम शहराचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद  उपस्थित होते. तसेच यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच भागवत लोकरे, धनंजय पवार, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top