धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरटा पसार झाल्याची घटना लाइफ केअर हॉस्पिटसमोरील रोडवर घडली.

साधना अभिजीत धाबेकर (गांधीनगर, धाराशिव) या समर्थ मंगल कार्यालयात लग्नासाठी जात होत्या. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकी चालकाने त्यांच्या स्कूटीजवळ येत त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण किंमत अंदाजे 80 हजार रूपयाचे हिसकावून पसार झाला. तक्रारीवरून आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

 
Top