धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 10) धाराशिव येथे काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत सर्व जाती धर्माच्या लोकांनी या रँलीचे आपआपल्या धर्माचे आचारण करीत मराठा योध्दा जरांगे पाटील यांचे स्वागत केले.  या रँलीत सर्वधर्म समभावाच्या एकतेचे दर्शन घडले. या रॅलीद्वारे जरांगे यांनी धाराशिव शहरातील रॅलीच्या मार्गावरील सर्व धार्मिक स्थळांमध्ये जाऊन तसेच महामानवांच्या पुतळ्यांना तसेच चौकांमध्ये प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध समाजातील नागरिकांनी, महिलांनी जरांगे यांचे जागोजागी उत्साहात स्वागत करत तसेच त्यांचे औक्षण करून या रॅलीला पाठबळ दिल्याचे दिसून आले.

मराठा आरक्षण शांतता रॅलीचा शुभारंभ सकाळी 1.30 वाजेच्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्यावतीने त्यांचा क्रेनच्या माध्यमातून हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तेथून कांही अंतरावर रॅली आण्णाभाऊ साठे चौकात पोहचली असता तेथे मांतग समाज बांधवांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात. समाजाचे आझाद मुस्लिम, दलित समाजासह अलुतेदार-बलुतेदारांकडूनही जरांगेंचे स्वागत आहिल्यादेवी होळकर प्रतिमा देवुन करण्यात आले.

तेथून पुढे धारासूर मर्दीनी मंदिरात देवीची आरती करून जरांगे यांनी जवळच असलेल्या हजरत खॉजा शमशोद्दीन गाझी दर्गाहमध्ये जाऊन चादर चढवली. त्यानंतर दर्गाह समोर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने स्वागत करून त्यांच्या आरक्षण मागणीस पाठींबा देण्यात आला. ही रॅली विजय चौक, जुनी गल्ली येथे पोहचल्यानंतर तेथे मराठा समाजाबरोबरच धनगर, कुंभार, गुरव समाजातील महिलांनी औक्षण करून तर पुरुषांनी हार घालून स्वागत केले. मुस्लीम समाजाच्या

गल्लीतून रॅली पुढे जात असताना जागोजागी फुलांचा वर्षाव करून जरांगे यांच्यासह मराठा समाजावर पुष्पवृष्टी करून त्यांचा मुस्लिम समाज बांधवांनी सत्कार केला. यावेळी जागोजागी विविध समाजबांधवांनी रॅलीत सहभागी मराठा समाज बांधवांसाठी पाणी, आईसक्रीम, नाष्टा, केळी आदींची व्यवस्था केली होती. रॅली काळा मारुती मंदीर, संत गाडगेबाबा चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचल्यानंतर सांगता करण्यात आली. यावेळी संत गाडगे बाबा चौक, डॉ. आंबेडकर चौक येथेही जरांगे यांचे परीट समाजबांधव व दलित बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या रॅलीत बारा बलुतेदार वर्गाने जागोजागी जरांगे यांचे स्वागत केले. 

 
Top