परंडा (प्रतिनिधी) - शेतकऱ्या सह सर्व सामान्य जनतेच्या  प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केल्याने पुणे येथिल वृंदावन फाऊंडेशन व सुरत चेन्नई ग्रिन फिल्ड महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने रविवार दि.7 जुलै रोजी सोलापूर येथे पुज्य नगरी न्यूजला भुमीपुत्र पुरस्कार देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने परंडा येथे  सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, नंदू शिंदे, गणी हावरे, बाशा शहाबर्फीवाले, घनश्याम शिंदे , खय्युंम तुटके,पत्रकार भजनदास गुडे, पत्रकार गोरख देशमाने, पत्रकार आशुतोष बनसोडे, ॲड. महादेव रेडे, एमआय एम शहर अध्यक्ष इरफान शेख, विष्णू खांडेकर, सोहेल सय्यद रामलिंग गायकवाड, आदी उपस्थित होते.

 
Top