धाराशिव  (प्रतिनिधी) - विद्यानगर बावी येथील जवाहर माध्यमिक आश्रम शाळेतील गणित विषय शिक्षक गजेंद्र नारायण सुरवसे हे 32 वर्षाच्या अहर्तताकारी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त सेवा गौरव सोहळा आश्रम शाळा विद्यानगर बावी येथे संपन्न झाला. 

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनंजय रणदिवे तर प्रमुख पाहुणे म्हणून देविदास पाठक उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव दयानंद मनोहरराव राठोड व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जगताप बी.यू.आश्रमशाळा खामगाव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  प्रभाकरराव डमरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्येची देवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मनोहरराव सोबा राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा संस्थेच्या वतीने शाल फेटा व बुके देऊन गौरव केला. तर मान्यवरांनी सुरवसे गजेंद्र नारायण यांचा सेवापुर्ती निमित्त सपत्नीक फेटा शाल पूर्ण पोशाख व  गौरव पत्र देऊन गौरव केला. याप्रसंगी देविदास पाठक यांनी नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांची जबाबदारी गुणवान नीतिमान विद्यार्थी घडविणे काळाची गरज विद्यार्थ्याला कौशल्य आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे आदी बाबी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी शिक्षण प्रक्रिया त्यातील शिक्षकांचे योगदान व जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने फिरवून आदर्श विद्यार्थी निर्माण करावे असे सांगीतले. सुरवसे यांनी 32 वर्षाच्या आपल्या सेवेच्या काळात अतिशय निष्ठेने व प्रमाणिकपणे आपले योगदान देऊन यशवंत किर्तीवंत विद्यार्थी घडविले. त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पदच आहे असे रणदिवे यांनी नमूद केले. त्याचबरोबर संस्थेचे सचिव दयानंद राठोड यांनी सुरवसे सरांनी संस्थेमध्ये दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कौतुक उद्गार काढले याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच विद्यमान विद्यार्थी विद्यार्थिनी यांनीही सरांचा भेटवस्तू शाल बुके देऊन सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात दामोदरे व्ही.आर.यांच्या सुगम संगीत विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साकळे बी. एस. यांनी तर आभार प्राध्यापक राठोड व्ही.टी. यांनी केले. 

 
Top