तुळजापूर (प्रतिनिधी)-  छतीसगड राज्यातील विलासपूर जिल्हा मराठा समाज अध्यक्ष शशांक चौहान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवार दि. 19 जुलै रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य देविचे पुजारीप्रविण कदम यांनी केले. 

देवी दर्शनानंतर धाराशिव  जिल्हा मराठा समाज बांधवाच्यावतीने विलासपूर जिल्हा मराठा समाज जिल्हाध्यक्ष शशांक चौहान, पुरूषोत्तम राजपूत, विनय वर्मा, मनोज मरावी यांचा सत्कार सकल मराठा समाज वतीने स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी  यांनी केला. यावेळी सत्यजित साठे, कुमार टोले, प्रविण कदम, दिपक पवेकर, प्रदीप अमृतराव, सचिन ताकमोघे, सुरज बागल, श्रीकांत कदम यांच्यासह समाज बांधव उपस्थितीत होते.

 
Top