तुळजापूर (प्रतिनिधी)-   श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ जाणारा प्रत्येक भाविक हा महाव्दार मधुन जावा असे विकास कामे विकास आराखड्यात करावेत. असा सुर तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प प्रशाद योजना अंतर्गत तिर्थक्षेत्र विकास आराखडा विचार विनिमय बैठकीत निघाला. यावेळी प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विकास आराखडा बाबतीत शहरवासियांच्या सुचना ऐकुण घेतल्या.

यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत मावजीनाथ महाराज, महंत सोमवार गिरी यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरच्या विकास संधी आली आहे. त्यामुळे ही संधी पदरात पाडून घ्या. तिर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास करताना कुणावर अन्याय होवू नये याची दखल घेण्याची सुचना महंतानी या बैठकीत केली.

प्रारंभी शहरवासियांनी आपल्या सुचना मांडताना म्हणाले की, विकास आराखडा बाबतीत स्पष्टता नसल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.  श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ जाणारा प्रत्येक भाविक  हा महाव्दार मधुन जावा असे विकास कामे विकास आराखड्यात करावेत. विकास कामे चारही बाजूला व्हावेत. विस्थापीत अधिक होवु नयेत. आराधवाडी भागात विकास कामे करु नयेत, असे तर काहींनी तर काहीनी करावेत अशा सुचना मांडल्या. श्रीतुळजाभवानी मंदीरात कुलधर्म, कुलाचार करता मंदिरात योग्य ठिकाणी जागा द्यावी. मंदीर समोर अर्ध वतुर्ळकार डी आकाराची मोकळी जागा ठेवावी. शहरवासियांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवा. 

आमदार पाटील म्हणाले कि आपण येथे केलेल्या सुचनांचा आदर करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र आपल्या लेखी सुचना आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात असे आवाहन केले. कुलधर्म, कुलाचार स्थळ बाबतीत संबंधित व्यक्तीतांना विश्वासात घेऊन योग्य जागा निश्चित करण्याची ग्वाही दिली.

यावेळी केले तिर्थक्षेत्र शिर्डी धर्तीवर विकास करण्याचे नियोजन आहे. विकास कामे करताना जागा जवळपास दोनशे एकर लागते. त्याचा विचार करा. जागा उपलब्ध करुन त्या ठिकाणी विकास कामे करु. माञ विकासाला खोडा घालु नका. या पलिकडे जावुन आपल्या विकास करुन जागतिक वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ निर्माण करावायाचे असल्याने सर्वानी सहकार्य करावे असे म्हणाले. यावेळी शहरवासिय मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top