भूम (प्रतिनिधी)- भूम येथील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल वाईज प्रमुख कार्यकर्त्यांची घेतली आढावा बैठक. या बैठकीमध्ये ईट, पाथरूड, वालवड, माणकेश्वर, आष्टा या प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्त्यासोबत निधी संदर्भात, अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतला निधी दिला आहे. जर कोणते ग्रामपंचायत निधीसाठी राहिली असेल तर सांगा त्याही ग्रामपंचायतला निधी देण्यात येईल असे यावे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सर्कल मधील समस्या असतील तर त्या सोडविण्यात येतील. रस्त्या संदर्भात अडचण निर्माण होत असेल तर तिथे मार्ग काढण्यात येईल असेही सावंत म्हणाले. भूम तालुक्यात आपण आणलेला विकास निधी आणि झालेले कामे आणि चालू असलेले कामे यासंदर्भात सर्कल वाईज नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी यावेळी सांगितले. आपण उजनीचे पाणी मतदारसंघात आणणारच आहोत. त्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न चालू आहे. भूम येथील हॉस्पिटलचे काम चालू असून, एसटी स्टँडचे हे काम चालू आहे असे हे यावेळी डॉ. सावंत यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मते कमी पडली, आपण कुठे कमी पडलो, आपल्या कुठे चुका झाल्या यासंदर्भात ही बैठकीमध्ये विचार मंथन झाले. या बैठकीसाठी धनंजय सावंत, संजय गाढवे, दता साळुंखे,दत्तात्रय मोहिते, गौतम लटके, बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब देशमुख, भोईटे आण्णा, अर्चना दराडे, बालाजी गुंजाळ, निलेश शेळवणे, विशाल ढगे, समाधान सातव, प्रवीण देशमुख, संजय पवार, सर्व शाखाप्रमुख, आजी -माजी सरपंच, सर्व विभाग प्रमुख, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top