तुळजापूर (प्रतिनिधी) - विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. त्याच धर्तीवर एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांची सुद्धा मूळ वेतनात पगारवाढ करावी. शिवसेनेचे  योगेश केदार, यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सदरील मागणी निवेदन देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपर मुख्य सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. लवकरात लवकर याबाबत निर्णय केला जाईल अशी ग्वाही दिली. 

गेल्या अनेक वर्षापासून एस. टी. कर्मचारी आपली पगारवाढ मिळण्यासाठी विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. असे निदर्शनास आले आहे की बाकीच्या महामंडळाच्या तुलनेत एस. टी. कर्मचारी यांच्या वेतनात खूप तफावत आहे. काही दिवसांपूर्वी विद्युत महामंडळ कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. आपल्या नेतृत्वात तोट्यात गेलेले महामंडळ फायद्यात आले आहे. त्या महामंडळासाठी कणा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची अपेक्षदेखील आपल्याकडून केली जात आहे. तरी माझी आपणांस विनंती आहे, की विद्युत महामंडळ प्रमाणे एस. टी. कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. असे म्हटले आहे.

 
Top