तुळजापूर (प्रतिनिधी) - आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी  गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शना खाली धाराशिव जिल्हा द्वारे खालील प्रमाणे आम आदमी पक्ष पदाधिकारी यांची नियुक्त करण्यात येत आहेत. यात तुळजापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर शेळके यांना बढती देवुन त्यांची उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात खालील पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. धाराशिव जिल्हाचे सचिव मेहबूब पाशा शेख, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके (तुळजापूर), धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष वसिम खान पठाण, नळदुर्ग धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष राजपाल देशमुख, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भुत्तेकर,  धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कशाळे, जिल्हा उपाध्य संजय  दणाणे, जिल्हा उपाध्यक्ष वसीम खान, धाराशिव जिल्हा संघटक मंत्री बिलाल रझवी, जिल्हा संघटक मंत्री मुख्तार शेख या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे व प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश कार्याध्यक्ष संग्राम शंकर घाडगे यांनी वरील सर्व पदाधिकारीचे अभिनंदन केले.

 
Top