तुळजापूर (प्रतिनिधी) - धाराशीव येथे बुधवार दि. 10 जुलै रोजी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शांतता रँलीत   तुळजापूर तालुक्यातुन मोठ्या संखेने मराठा समाज बांधव सहभागी झाला होता. धाराशिव येथील शांतता रँली सांगता सभेत तुळजापूर तालुका सकल मराठा समाजवतीने श्री तुळजाभवानी मातेची  108 अंबुकी कवड्याची माळ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना घालण्यात आली होती.

तुळजापूर शहरातील मराठा मनोज जरांगे पाटील सारखा हुबेहुबे दिसणाऱ्या युवकास पाहण्यास व सोबत फोटो काढण्यास मराठा बांधव गर्दी करीत होते. तुळजापूर तालुक्यातील महायुती, महाविकास आघाडीचे इच्छुक या रँलीत सर्वसामान्य मराठ्यांप्रमाणे सहभागी झाले होते. यात रोहन देशमुख, धिरज पाटील सह अनेक इच्छुकांचा सहभाग ठळकपणे दिसून आला. विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यातील शासकिय निमशासकीय कर्मचारी मंडळाने या रँलीस मोठा हातभार लावला. तर यशवंतराव महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी तीन हजार चिवडा पाकीट तयार करुन ते धाराशिव रँलीत वाटप केले.

तुळजापूर तालुका हा पश्चिम  महाराष्ट्र व कर्नाटक जवळ असलेला तालुका असुन, तुळजापूर तालुक्याच्या सरहद्द असलेल्या तामलवाडी, जळकोट, इटकळ, बार्शी भागातील मराठा समाज बांधव आपल्या आपल्या  वाहनाने तिर्थक्षेञ तुळजापूर येवुन छञपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मगच धाराशिवकडे एक मराठा लाख मराठा असा घोषणा देत रवाना होत होता. या रँलीत सहभागी होणाऱ्यांसाठी गावोगाव पाणी, फळे, नाष्टा सोय केली होती.

 
Top