धाराशिव (प्रतिनिधी)- अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत समाजातील वेगवेगळ्या घटकातील तरुण-तरुणींसाठी तसेच विशेषत: मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योगधंदे उभारणीसाठी आहे. तसेच व्यवसाय नवीन जोमाने व वेगवेगळ्या पद्धतीने वाढवण्यासाठी लागणारे भांडवल या योजनेच्या माध्यमातून तरुण युवा वर्गास दिले जाते. या योजनेअंतर्गत विशेष म्हणजे मराठा समाजातील तरुणांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाते. परंतु ग्रामीण भागातील असंख्य तरुण-तरुणींना या योजने विषयी रीतसर माहिती नाही. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पात्र तरुण-तरुणींना कर्ज योजनेची माहिती दिल्यास व प्रत्येक गावात महामंडळाच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू केल्यास, गरजुंना अर्थ सहाय्य प्रक्रियेची माहिती मिळेल. असे विनंती निवेदन रूपामाता फाऊंडेशनतर्फे संस्थेचे सचिव अँड. अजित व्यंकटराव गुंड यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना धाराशिव येथील आढावा बैठकीसाठी आले असता देण्यात आले.

 
Top