भूम (प्रतिनिधी)-हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाला आपल्याच पक्षातील मोठे केलेल्या  गद्दारांनी सुरुंग लावण्याचे काम केले होते. त्यावेळी निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यावेळी एक निष्ठावंत म्हणून धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख  सुनील काटमोरे यांची निवड केल्यानंतर आज त्या निवडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. धाराशिव जिल्हयात केलेल्या कामाचा निष्ठा वर्षपूर्ती अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सपूर्द करून त्यांच्या हस्ते मातोश्री या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले. सुनिल काटमोरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली आहे. 

धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी वाढदिवसाचे औवचित्य साधून वाढदिवसानिमित मातोश्री येथे निष्ठा या वर्षपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोबत चाळीसगाव संपर्कप्रमुख प्रकाश वाणी आणि सचिन भांगे उपस्थित होते. हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जातिवंत शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्यांचा आवाज मातोश्री पर्यंत पोहोचवण्याचे काम काटमोरे यांनी केले आहे.

 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेल्या शिवसेना पक्षाशी गद्दारांनी गदारी करून  शिवसेना पक्ष संपवण्याचा डाव आखला होता. त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे  यांनी एक निष्ठावंत कर्तबगार शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून सुनील  काटमोरे यांची निवड केली. त्या निवडीची परतफेड म्हणून लगेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक गाव, खेड्यात जाऊन शिवसेना आणि हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुखाचे व उद्धव ठाकरे यांचे काय घनिष्ठ नाते आहे हे गाव खेड्यामध्ये जाऊन जनजागृती केली. यामुळे गाव खेड्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षाची एकनिष्ठ राहिला मतदानाच्या वेळी व मतदाना अगोदर धाराशिव जिल्ह्यातील एक पक्ष मजबूत करण्याच्या अनुषंगाने स्ट्राँग बूथ प्रमुखांचे निवड करून शिवसैनिक शाखा तयार केल्या. त्यामुळे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आले. भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व मंत्री तानाजी सावंत यांना मतदारसंघातून नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शिवसैनिकांनी विडा उचलला आहे. काटमोरे यांनी गट तट बाजूला ठेवून शिवसैनिकांची एक वज्रमूठ आवळली असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचे गर्वहरण करण्याचे काम निष्ठावंत शिवसैनिक करणार असल्याचे निष्ठावंत शिवसैनिक यांनी सांगितले आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेच्या बद्दल चर्चाही करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील गद्दारांना धूळ चारण्याचे काम शिवसैनिकांनी केले असल्यामुळे निष्ठावंत  शिवसैनिकांना आपण कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. यापुढेही लोकसभेप्रमाणेच  विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती आखा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांना सांगितले आहे. 

सुनिल काटमोरे

धाराशिव जिल्हा संपर्क प्रमूख.

 
Top