तुळजापूर  (प्रतिनिधी) - रोटरी क्लब तुळजापूर अध्यक्षपदी प्रशांत अपराध व सचिवपदी संतोष लोखंडे यांची 2024-25 सालासाठी निवड  करण्यात आली आहे. या निवडीचे पञ लातुर येथे झालेल्या कार्यक्रमात डिस्टिक गव्हर्नर 3132 चे डॉक्टर सुरेश साबू यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रोटरी पदाधिकारी उपस्थितीत होते. लवकरच  रोटरीचे  आंतरराष्ट्रीय पदाधिकारीच्या उपस्थितीत तुळजापूर  येथे पदग्रहण सोहळा होणार असल्याची माहीती नुतन रोटरी अध्यक्ष प्रशांत अपराध  यांनी दिली.

 
Top